जी एस पी एम परिवाराच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य मशाल रॅली व प्रेरणादायी शिवव्याख्यान उत्साहात संपन्न

उदगीर : गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ (जी.एस.पी.एम.), उदगीर अंतर्गत शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, राजीव गांधी तंत्रनिकेतन, एस. आर. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी , राजीव गांधी आय.टी.आय.  व जी एस पी एम इंटरनॅशनल स्कूल उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजन्मोत्सव २०२६) निमित्त आयोजित भव्य मशाल रॅली व शिवव्याख्यान कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शिवमय वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ऐतिहासिक उदगीर किल्ला येथून करण्यात आली. संस्थेचे सचिव  अमित राठोड यांच्या हस्ते उदगीर येथील बाबा यांच्या समाधीस्थळी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मशाल प्रज्वलित करून रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी सर्व आस्थापनाचे प्राचार्य उपस्थित होते.

ही भव्य मशाल रॅली उदगीर किल्ला, चौबारा, पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कॅप्टन चौक, औटे पेट्रोल पंप व लहुजी साळवे चौक या प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करत जी.एस.पी.एम. कॅम्पस येथे पोहोचली. रॅलीदरम्यान ढोल-ताशांच्या गजरात शिवगर्जना, स्फूर्तिदायक घोषणा करण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज  चौक व कॅप्टन चौक येथे विद्यार्थ्यांनी झांज, झेंडा नृत्य, कराटे प्रात्यक्षिक तसेच शिवपराक्रम दर्शविणारी आकर्षक सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांचे मन जिंकले.

या मशाल रॅलीमध्ये शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, राजीव गांधी तंत्रनिकेतन, एस. आर. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ,  राजीव गांधी आय.टी.आय. व  जी एस पी एम इंटरनॅशनल स्कूल उदगीर येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी शहरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून रॅलीचे स्वागत केले.

यानंतर सकाळी १० वाजता जी.एस.पी.एम. कॅम्पस, जळकोट रोड येथे शिवव्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बापूराव राठोड हे उपस्थित होते. प्रमुख शिवव्याख्याते म्हणून मा. शिवशंकर बालाजी लांडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, राष्ट्रप्रेम, शिस्त, नेतृत्वगुण व स्वराज्याची संकल्पना यावर अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव अमित राठोड उपस्थित होते. तसेच राजीव गांधी तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी. डी. जाधव, एस. आर. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य विजय येळवंतगे व राजीव गांधी आय.टी.आय.चे प्राचार्य पी. एम. मरशीवने यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव  अमित राठोड यांनी केले. सूत्रसंचालन बी. फार्मसीचे विद्यार्थी लक्ष्मण जायभाये यांनी तर आभार प्रदर्शन सेजल टोम्पे यांनी केले.

या कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती समिती, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिवजयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमामुळे उदगीर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश साध्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *